Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

दिव्यांग आयुक्तालयात पदभरती लवकरच अपॆक्षित ! – Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023

hanuman

Active member
satymev.jpg

Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023


: Divyang Kalyan Ayuktalay Recruitment 2023 Bharti, Recruitment 2023 updates & latest details will be added here on this link. Commissionerate of Disability Welfare is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts. For more details about Divyang Kalyan Ayuktalay Pune Bharti 2023, Disabled Welfare Recruitment 2023, Commissioner Social Welfare Pune Bharti 2023, Commissionerate of Disability Welfare Bharti 2023 Maharashtra, visit our website . Further details are as follows:-​

Ne.gif


सामाजिक न्याय विभागातून स्वतंत्र विभाग म्हणून नव्याने स्थापन झालेल्या ‘दिव्यांग’ आयुक्तालयास आता ‘दिव्यांगा’च्या सक्षमीकरणासाठी पदभरतीची प्रतीक्षा आहे. या विभागाअंतर्गत राज्यभरात आयुक्तालयातील दोन हजार ७३ पदांसाठी भरती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आयुक्तालयाकडून सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, या विभागाच्या सुमारे ११८ कोटी रुपयांच्या खर्चास सरकारने पूर्वीच मान्यता दिली आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुरेशा मनुष्यबळाअभावी खीळ बसली आहे.



यापूर्वी ‘दिव्यांग विभाग’ सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविला जात होता. त्यामध्ये पूर्वी दिव्यांगाचे सात प्रकार होते. त्यानुसार देशात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची २०१६पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या योजना सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली राबविल्या जात होत्या. दिव्यांगाच्या कल्याण व पुनर्वसनासाठी प्रादेशिक; तसेच जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय कार्यरत नाही. जिल्हा परिषदेतील जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत दिव्यांगाच्या योजनेच्या अंमलबजावणीसह इतर कामे केली जातात.



मंत्रालयांमध्ये दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र सचिव, सहसचिव किंवा उपसचिव, अवर सचिव, वरिष्ठ स्वीय सहायक, कक्ष अधिकारी, लेखा अधिकाऱ्यासह ६७ पदे निर्माण करण्यात आली आहेत. दिव्यांग कल्याण आयुक्तालयांतर्गत आय़ुक्तालयासाठी आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, लेखाधिकारी, निरीक्षक, कार्यालयीन अधीक्षक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ते शिपाई, विधी अधिकारी अशी ५४ पदे निर्माण करण्यात आली आहे.



गाव पातळीपासून ते जिल्हा आणि प्रादेशिक पातळीवरील विविध योजनांची अंमलबजावणी करणे अशक्य होत आहे. त्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याने दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयात आता पदभरती करण्याची मागणी करण्यात येत आहे.


Previous Updates :

दिव्यांग उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!! दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक या तात्पुरत्या स्वरुपाच्या (6 महिने) पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत लेखी अर्ज आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1, येथे टपालाने अथवा commissioner.disability@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


Ne.gif


Divyang Kalyan Ayuktalay Pune Bharti 2022

  • पदाचे नाव – राज्य समन्वयक
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त दिव्यांग कल्याण, चर्चरोड, पुणे-1
  • ई-मेल पत्ताcommissioner.disability@maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022

Divyang Kalyan Ayuktalay Bharti 2022 – Eligibility Criteria


या पदासाठी शैक्षणिक अर्हता-

  • संगणक शास्त्र/माहिती व तंत्रज्ञान यामधील पदविका/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • किंवा संगणक शिक्षकामधील पदवी, आणि माहिती तंत्रज्ञान संगणक या मधील नामांकित कंपनीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
  • या पदासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पूर्ण असावे
  • मराठी व इंग्रजी भाषेत प्रभूत्व असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय-3, चर्चरोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-400001, या पत्त्यावर किंवा 020-26126471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.​



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock