Goa Canacona Industrial Jobs – Art and Culture Minister Ramesh Tawadkar expressed his inclination towards starting a project in Kanakonda that would provide 5 to 6 thousand jobs at a time. He was speaking at a felicitation ceremony organized by the Charrasta Sarvajivan Ganeshotsav Mandal. The ceremony was attended by Social Welfare Minister Subhash Phaldesai, Kanakonda Municipal Mayor Sara Desai, Kanakonda Deputy Collector Prataprao Naik Gaonkar, Mameldar Gajesh Shirodkar, Executive Electrical Engineer Govind Bhat, Corporators Ramakant Naik Gaonkar, Simon Rebello, Mandal President Kushwant Bhagat, local corporators Hemant Naik Gaonkar and Ajay Bhagat.
एकाच वेळी ५ ते ६ हजार नोकऱ्या देण्यासारखा प्रकल्प काणकोणात सुरू करण्याकडे आपला कल असल्याचे उद्गार कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केले. ते चाररस्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. या समारंभाला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, काणकोण पालिकेच्या नगराध्यक्षा सारा देसाई, काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर, मामलेदार गजेश शिरोडकर, कार्यकारी वीज अभियंता गोविंद भट, नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, सायमन रिबेलो, मंडळाचे अध्यक्ष कुशवंत भगत, स्थानिक नगरसेवक हेमंत नाईक गावकर व अजय भगत उपस्थित होते. काणकोणच्या नगराध्यक्षा सारा देसाई यांनी पालिका क्षेत्रातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. यावेळी स्थानिक नगरसेवक हेमंत नाईक गावकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज नाईक गावकर यांनी केले. मंडळाचे संस्थापक अजय भगत, मंडळाचे अध्यक्ष कुशवंत भगत, दिलीप देसाई, साहिल देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Goa Film City Jobs – The talk of a film city in Goa has been going on for the last few days. There was a response from several places after it emerged that a site for FilmCity was underway. The project will create around 5,000 jobs, he said. Goa Film City Jobs will be a adding that 10 lakh square metres of land has been earmarked in Kankon. FilmCity was the concept of former Chief Minister late Manohar Parrikar.
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून फिल्म सिटीबाबतची चर्चा सुरू आहे. फिल्मसिटीसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अनेक ठिकाणांहून याला प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले. फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती.
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या काणकोण येथे फिल्मसिटी व्हावी, त्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली होती. त्यानंतर आता समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले. फळदेसाई म्हणाले की, फिल्मसिटी उभारल्यानंतर पहिल्या पाच वर्षातच किमान 5000 नोकऱ्या उपलब्ध होतील. त्याचा पर्यटन क्षेत्रावर आणि इतर संबंधित क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होईल. सरतेशेवटी त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे. या प्रकल्पासाठी काणकोण येथील भगवती पठाराजवळ सुमारे 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केली आहे. ही जागा कोमुनिदादची आहे. फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती. काणकोणमधील स्थानिकांनाही फिल्मसिटीची उत्सुकता आहे.
अनेक लोकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याची ऑफर दिली, त्यातील एक प्रस्ताव काणकोणचाही होता, असे ते म्हणाले. दरम्यान, यापुर्वी काही चित्रपट निर्मात्यांनी, फिल्म सिटीत रोजगार संधींसह ध्वनी मंच, धार्मिक स्थळे, तात्पुरते सेट, प्रशिक्षण संस्था आणि ओपन एअर थिएटर यासारख्या सुविधांची तरतूद सुनिश्चित करावी, असे म्हटले होते.
The post नवीन प्रकल्पात एकाचवेळी ६ हजार उमेदवारांना मिळणार नोकऱ्यांची संधी! – Goa Canacona Jobs appeared first on महाभरती...