पुणे महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या 500 जागा रिक्त; | Pune Shikshak Bharti 2023

hanuman

Active member

Pune Shikshak Bharti 2023


:While crores of rupees are being spent on the schools of Pune Municipal Corporation, on the other hand, there are not enough teachers to teach the students. Out of the total number of teacher posts in Pune Municipal Corporation, 727 posts were vacant. The municipal corporation received 219 teachers through inter-district transfer, but still 508 posts are vacant. But as the process of teacher recruitment is not done by the government through the holy portal, the municipal administration has also become helpless.






पुणे महापालिकेच्या शहरात मराठी, उर्दू, कन्नड, इंग्रजी माध्यमाच्या मिळून एकूण २८४ शाळा आहेत. या ठिकाणी बालवाडी पासून ते इयत्ता १०वी पर्यंत शिक्षण दिले जाते. शहरातील ९३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.



या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असतात. वर्गखोल्या वाढविण्यासाठी भवन विभागातर्फे तरतूद केली जाते. गेल्या काही वर्षापासून इ लर्निंग, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यावरही महापालिकेचा भर आहे. या गोष्टींवर भर असला तरीही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या शाळेतील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढत गेली आहे. त्यातच महापालिकेत हद्दीलगतची ३२ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील रिक्त जागांमुळे ही संख्या वाढली आहे.



महापालिकेच्या जुन्या हद्दीतील शाळांमधील शिक्षकांच्या ३१७ जागा रिक्त आहेत, तर समाविष्ट गावातील रिक्त जागांची संख्या ३५० इतकी आहे. गेल्या दीड वर्षात महापालिकेकडे २१९ आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणे आली होती. त्यास नुकतीच महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. त्यामुळे येत्या काळात महापालिकेकडे २१९ शिक्षक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रिक्त जागांची संख्या घटून ७२७ वरून ५०८ इतकी झाली आहे. पण अद्याप यातील अनेक शिक्षक महापालिकेकडे रुजू झालेले नाहीत.







तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ८९ उपशिक्षक कमी असून पदवीधरच्या ४२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा बंद राहण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. काही ठिकाणी एक शिक्षक असल्याने त्याच्यावर अतिरिक्त ताण येत असून त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी पालकांमध्यून होत आहे.​




भोर तालुक्यात २७४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून १ ते ७ वीपर्यंत सुमारे नऊ हजार ७११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर या शाळांवर ६५३ शिक्षक कार्यरत आहेत. दीड वर्षापूर्वी भोर तालुक्यातील १६१ शाळा दुर्गम होत्या. या दुर्गम भागात तीन वर्षे काम केल्यावर सुगम भागात ऑनलाइन बदल्या झाल्या होत्या. मात्र, सुगममध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर दुर्गम भागात नवीन शिक्षक रुजू झालेले नाहीत, त्यामुळे दुर्गम भागात प्राथमिक शिक्षक कमी आहेत. शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे सदर शाळांवर शिक्षक आले नाहीत.

त्यामुळे भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी नीरा देवघर, भाटघर धरण भागातील शाळांवर ८९ उपशिक्षक कमी आहेत, तर पदवीधर जागा समुपदेशनमध्ये शिक्षकांनी स्वेच्छेने घेतल्या पहिजेत; पण दुर्गम भागातील शाळा पदवीधर शिक्षक घेत नाहीत. त्यामुळे पदवीधर ४२ जागा रिक्त आहेत.​

Pune Shikshak Recruitment 2022






The post appeared first on .